मराठी महिन्यांची माहिती (संपूर्ण) | Marathi Months Information

समृद्ध आणि गौरवशाली इतिहास मराठी भाषा लाभलेला आहे. अवघ्या महाराष्ट्राची ही मायबोली. जगभरात मराठी भाषेतील प्रत्येक घटक हा  समृद्ध आहे, तसेच तो निसर्गाशी जवळीक साधणारा आहे. याच समृद्धतेतील एक महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत मराठी महिने

इतिहास- 

पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवरती कमी-अधिक प्रमाणात पडतात. याचा परिणाम वातावरणावर होतो, यामुळेच  ऋतु  बदलतात. 

मुख्यत: तीन ऋतु आहेत पुन्हा ते सहा उपऋतु मध्ये विभागले आहेत.

हिंदू कालगणना ही चंद्राच्या कलेवर अवलंबून आहे. शुक्ल पक्षात चंद्र रोज कले कलेने वाढत जातो. पंधरा दिवसांनी जेव्हा पूर्ण चंद्र आकाशात दिसतो, तेव्हा पौर्णिमा असते. पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष सुरु होतो. यात चंद्र रोज कलेकलेने कमी होतो. ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, त्याला आमावस्या म्हणतात. दर अमावस्येनंतर नवीन महिन्याला  सुरुवात होते. एकूण १२ मराठी महिने आहेत. मराठी महिण्यात 30 दिवसांचा समावेश होतो. या शास्त्रामध्ये एकुण 27 नक्षत्रांचा समावेश आहे.

 मराठी महिन्यांची माहिती

१) चैत्र महिन्यांची माहिती

मनाला नवीन उभारी आणि उमदे देणारा चैत्र  महिना. मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. गुडीपाडवा हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस होय. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे.  याच दिवशी चैत्र नवरात्रींना सुरुवात होते. यामुळे सगळी कडे उत्साहाचे वातावरण असते.

पानगळी मुळे, वातावरणात जी रुक्षता आलेली असते, ती रुक्षता चैत्र महिन्याच्या सुरुवातीपासून, झाडांना नवीन फुटलेल्या पालवी मुळे नाहीशी होते. आंबेमोहराच्या वासाने आणि कोकिळेच्या गाण्याने जणू नवीन चैतन्य निर्माण होते.

चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडव्याने होते, चैत्र नवमीला श्रीरामनवमी साजरी करतात, तर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते.

चैत्र महिना वसंत ऋतुत येतो. इंग्रजी कालगणनेनुसार मार्च ते एप्रिल महिन्यात चैत्र महिना येतो. या महिन्यात उन्हाची सुरुवात चांगलीच झालेली असते. 

२) वैशाख महिन्याची माहिती

वैशाख महिना मराठी महिन्यातील दूसरा महिना होय. रणरणत्या उन्हाने जीवाची तगमग करणारा वैशाख, म्हणून याला वैशाख वणवा असेही म्हणतात. या महिन्यात उन्हाचे प्रमाण खूप असते.  

इंग्रजी कॅलेंडरनुसार वैशाख महिना हा एप्रिल ते मे या दरम्यान असतो.वैशाख महिना ग्रीष्म ऋतुत येतो. 

 वैशाख महिण्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीय येते, अक्षय तृतीय हा सण साडे तीन मुहूर्तापैकी आर्धा मुहूर्त आहे. वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा साजरी करतात.

पूर्ण वर्षभरात एकदाच आढळणाऱ्या, फळांचा राजा असणाऱ्या आंब्या वरती या महिन्यात येथेच्छ ताव मारला जातो. वैशाख महिन्यात बाजारात विविध प्रकारचे आंबे पाहायला मिळतात. 

३) जेष्ठ महिन्याची माहिती

जेष्ठ महिना हा मराठी महिन्यातील तिसरा महिना आहे.उन्हाच्या कडाक्यानंतर या महिन्यात पावसाला सुरुवात होते. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार वादळी पाऊस ही जेष्ठ महिन्याची ओळख.

जेष्ठ महिना हा ग्रीष्म ऋतुत येतो. इंग्रजी कलेंडरनुसार मे ते जून महिन्या दरम्यान जेष्ठ महिना येतो.

जेष्ठ पौर्णिमा ही वटपोर्णिमा म्हणून साजरी करतात. महिला वर्गात वटपोर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच या महिण्यात कर्नाटकी बेंदूर ही साजरा करतात. पूर्वी आस म्हटलं जायचं की, बेंदरानंतर सणांचा पुर येतो. ते अगदी खरंय, यानंतर चाहूल लागते ती, विविध सणांची आणि व्रत वैकल्यांची.

वैशाखाच्या रखरखत्या उन्हाने तापलेल्या धरणीला शांत करणारा हा जेष्ठ महिना होय. या महिण्यात शेतीच्या कामांची लगबग असते.

४) आषाढ महिन्याची माहिती

आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना आहे. आषाढ महिन्यात पावसाची संततधार चालू असते. सततच्या पावसामुळे वातावरण थंड झालेले असते. शेतीची बरीचशी कामे या महिण्यात पूर्ण होतात.

इंग्रजी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा जून ते जुलै दरम्यान असतो.आषाढ महिना वर्षा ऋतुत येतो.

आषाढ शुक्ल एकादशी ही आषाठी एकादशी म्हणून ओळखली जाते. लाडक्या विठुरायाला भेटायला लोक आषाढी वारीने पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे.

आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतात. आपल्या संस्कृतीत कृतज्ञतेला महत्वाचे स्थान आहे, म्हणूनच आपल्या गुरू स्थानी असलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी होते.

याच पौर्णिमे दरम्यान महाराष्ट्रीय बेंदूर साजरा होतो. या दिवशी बैलांना छान सजवून त्यांची मिरवणूक काढतात, आणि त्यांच्या अपार कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.

५) श्रावण महिन्याची माहिती

श्रावण महिना हा मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे, तर इंग्रजी कॅलेंडरनुसार श्रावण महिना जुलै ते ऑगस्ट महिन्यात येतो. श्रावण महिना हा वर्षा ऋतुत येतो.

श्रावण महिन्यात पावसाची संततधार थांबते, सगळी कडे हिरवेगार वातावरण पाहायला मिळते. पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांची लगबग सुरू होते.

श्रावण महिन्याला धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिण्यात, निसर्गाला लाभलेली स्थिरता, मानवी मनाला लाभावी, या दृष्टीने अध्यात्मीकदृष्ट्या, हा महिना महत्त्वाचा आहे.

प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शंकराची उपासना मोठ्या श्रध्देने केली जाते, तर श्रावण मंगळवारी मंगळागौरीची पुजा केली जाते. या महिन्यात विविध व्रतवैकल्य आणि पुजा मोठ्या भक्तीभावाने केली जातात.

 श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी करतात, यानंतर श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी करतात, याच  दिवशी बहिणभावाच्या प्रेमाचा रक्षाबंधन हा सण साजरा होतो. श्रावण कृष्ण अष्टमीला गोकुळाष्टमी / श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी होते. असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावण महिना होय.

६) भाद्रपद महिन्याची माहिती

भाद्रपद महिन्यातील सण
मराठी महिन्यांची माहिती (संपूर्ण) | Marathi Months Information 4

भाद्रपद हा मराठी महित्यातील सहावा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येतो. तर या महिन्या दरम्यान  शरद ऋतु असतो.

अखंड महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हवाहवासा वाटणारा पाहुणा या महिन्यात सर्वांच्या घरी विराजमान होतो, तो पाहुणा म्हणजे, आपणा सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मोठ्या उत्साहात घरोघरी गणपती बाप्पा चे आगमन होते. सर्वजण छान आरास करून गणपती बाप्पा ला सजवतात. 

यानंतर दोन दिवसांनी जेष्ठा गौरींचे आगमन होते. दुसरया दिवशी त्यांचे पूजन होते. तर भाद्रपद अष्टमीला घरगुती गणपती व जेष्ठा गौरी यांचे कठोर अंतकरणाने विसर्जन होते.

भाद्रपद चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होत. 

७) आश्विन महिन्याची माहिती

मराठी महिन्यातील आश्विन हा सातवा महिना होय. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना सप्टेंबर ने ऑॉक्टोंबर महिन्यात येतो. आश्विन महिना हा शरद ऋतुत येतो.

आश्विन महिण्याच्या पहिल्या दिवशी शारदीय नवरात्रउस्तवाला सुरुवात होते, या नऊ दिवसातील पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. या दिवसांत मोठ्या भक्तीभावाने व श्रध्देने देवीची पुजा केली जाते. या नऊ दिवसांत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. नऊव्या दिवशी खंडेनवमी साजरी होते, या दिवशी घरातील सर्व शस्त्रांची पुजा केली जाते, तर दहाव्या दिवशी विजया दशमी म्हणजेच दसरा साजरा होतो.

दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे.

आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी होते.याच दरम्यान थंडी वाढायला सुरुवात होते

या महिण्यात पाऊसाने उसंत घेतलेली असते, म्हणून शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. पिकांच्या काढणीची सुरुवात होते. थंडीची सुरुवात या महिन्यात होते.

 अश्विन महिन्यात सर्वांच्या आवडत्या दिवाळी सणाची सुरुवात होते. अश्विन कृष्ण एकादशीला वासुबारसाने दिवाळीला सुरुवात होते. यानंतर धनत्रयोदशी साजरी होते, त्यानंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात नरक चातुर्दशी व लक्ष्मीपूजन साजरे होते. 

८) कार्तिक महिन्याची माहिती

कार्तिक महिन्यातील सण
मराठी महिन्यांची माहिती (संपूर्ण) | Marathi Months Information 5

कार्तिक महिना हा मराठी महिन्यातील आठवा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यात येतो. हेमंत ऋतूत कार्तिक महिण्याचा समावेश होतो.

कार्तिक महिण्याच्या पहिल्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा करतात. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पुर्ण मुहूर्त आहे. तर दुसरया दिवशी भाऊबीज साजरी होते. दिवाळीचे हे दिवस खुप आनंदात पार पाडतात.

 कार्तिक शुक्ल द्वादशीला तुलसी विवाहास प्रारंभ होतो.

९) मार्गशीर्ष महिन्याची माहिती

मार्गशीर्ष हा मराठी महिण्यातील नववा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा नोव्हेंबर ते डिसेंबर महिण्यात येतो. हा महिना हेमंत ऋतुत येतो.

मार्गशीर्ष महिष्याच्या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीव्रताची पुजा घरोघरी केली जाते.

मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

१०) पौष महिन्याची माहिती

मराठी महिन्यातील पौष हा दहावा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा डिसेंबर ते जानेवारी महिन्यात येतो. शिशिर ऋतु मध्ये पौष महिना येतो.

पौष महिन्यातील कृष्ण पक्षात संक्रांतीचा सण साजरा होतो. या सणाचा पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत तर तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा होतो.

पौष महिन्यात थंडीचे प्रमाण खुप वाढते, म्हणून या दरम्यान उष्ण पदार्थांचे सेवण आहारात वाढवले जाते.

पानगळीचे दिवस या दरम्यान सुरु होतात.

११) माघ महिन्याची माहिती

 माघ हा मराठी महिन्यातील अकरावा महिना आहे.  इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात येतो. माघ महिना शिशिर ऋतुत येतो. 

माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थाला गणेश जयंती साजरी होते. 

 माघ महिण्याच्या कृष्ण पक्षात महाशिवरात्र साजरी होते. या महिन्यात उन्हाचा कडाखा वाढायला सुरुवात होने. 

१२) फाल्गुन महिन्याची माहिती

फाल्गुन हा मराठी महिन्यातील बारावा महिना आहे, म्हणजेच शेवटचा महिना आहे. इंग्रजी  कॅलेंडरनुसार हा महिना फेब्रुवारी ते मार्च दरम्यान येतो. वसंत ऋतुची सुरुवात या महिण्यात

होते.

फाल्गुन महिण्याच्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा साजरी करतात, म्हणजेच शिमगा साजरा करतात. यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करतात.

या महिण्यात थंडीचे कमी प्रमाण होते. वसंत ऋतूच्या आगमनाने या महिन्यातील वातावरण, आल्हाददायक होते.

असे हे मराठी दिनदर्शिके मधले समृद्ध बारा मराठी महिने.

धन्यवाद.

मराठी महिन्यात किती दिवस असतात?

मराठी महिन्यात ३० दिवस असतात

मराठी महिन्याची नावे सांगा?

चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, आणि फाल्गुन हे बारा मराठी महिने आहेत

एकूण किती मराठी महिने आहेत?

एकूण बारा मराठी महिने आहेत, चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, आणि फाल्गुन.

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This